
सविस्तर वृत्त असे की, लासलगाव कोटमगाव रस्त्यावर कोटमगाव शिवारात मोकाट सोडलेल्या गाई वर नैसर्गिक आघात झाल्याने त्या प्राण्याचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत माणूस हा स्वार्थी वृत्तीचा प्राणी आहे . ज्या जनावरांपासून आपल्याला दूध शेण हे मिळते तोपर्यंत त्या जनावरांना कुटुंबातील व्यक्ती समजून मानतात परंतु ते जनावर जेव्हा वयस्कर किंवा आजारी होतात अशावेळी निर्दयी मनुष्य त्या जनावरांना वाऱ्यावर सोडून देतात परंतु गाय ही हिंदू धर्मात ३३ कोटी देवांचे दैवत मानले जाते. हे माहीत असून सुद्धा आहे निर्दयी लोक या गोष्टीचा विचार करत नाही. असेच एक उदाहरण कोटमगाव रस्त्यावर घडले. ग्रामपंचायत कोटमगाव येथील उपसरपंच श्री .योगेश पवार हे नाशिक वरून लासलगाव या दिशेने कोटमगावला येत असताना कोटमगाव रस्त्यावर वृंदावन हॉटेल जवळ गाय ही मृत अवस्थेत दिसली ही गाय सकाळी ९:३० पासून मृत अवस्थेत होती.
असे शेजारील मजूर वर्गाकडून समजले. त्यांनी तात्काळ दखल घेऊन कोटमगाव येथील श्री बापू निकम यांचे जेसीबी बोलून कोटमगाव हद्दीमध्ये खड्डा खोदून त्यात गायीच्या मृतदेह पुरला. त्याप्रसंगी कोटमगाव विविध सहकारी सोसायटीचे व्हा चेअरमन श्री. सचिन बसते श्री. रमेश गांगुर्डे चि. गौरव शिरसाट श्री. मयूर बोराडे चि. विठ्ठल गांगुर्डे जेसीबी मालक श्री बापू निकम या सर्वांनी सहकार्य केले. याप्रसंगी उपसरपंच श्री.योगेश पवार यांनी सर्व समाजातील घटक तसेच गोरक्षक यांना कळकळीची विनंती केली की, अशी परिस्थिती गाई जनावरे दिसल्यास या हिंदू धर्मात जन्माला आलो आहे . आपल्या पवित्र धर्मात गोमाता ही पवित्र मानले आहे त्याच्या रक्षणासाठी समाजाने मदत करावी असे आव्हान केले आहे.