अहिंसेची पुजारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी . ज्ञानेश्वर भवर

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव ता.निफाड विद्यालयात म.गांधी व.भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.शासनाच्या स्वच्छतामोहीम कार्यक्रम अंतर्गत व आदेशानुसार दिं १/१०/२३ व दि.२/१०/२०२३ रोजी शालेय परिसर व ग्राम स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वच्छता कार्यक्रम राबविताना ओला कचरा, प्लास्टिक,सुका कचरा वेगळा करून त्याचे सुयोग्य असे व्यवस्थापन केले.
२ऑक्टोबर म.गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री केदारे एम टी. सर होते. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले.
व म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली.विद्यार्थ्यांपैकी कु सोनाली.दोंदे,प्रांजली कु .कल्याणी , कु. गुरगुडे कू. बंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.१०वी .ची. विद्यार्थिनी कुमारी कल्याणी सुपेकर हिने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर श्री केदारे सर ,श्री गांगुर्डे सर,श्री दिवटे सर श्री कदम सर श्री देवढे डि.एल .यांनी विशेष परिश्रम घेतले.