ग्रामपंचायत कोटमगाव येथे “अमृत कलश यात्रेचे” व महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी . ज्ञानेश्वर भवर,कोटमगाव

सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत कार्यालय कोटमगाव येथे दि.१-१०-२०२३ रोजी शासनाच्या आदेशानुसार आजादीच्या अमृत महोत्सव निमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत “अमृत कलश यात्रेचे” आयोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ आरतीताई कडाळे यांनी श्रीफळ वाढवून केली. कलश यात्रेमध्ये ग्राम विकास अधिकारी श्री शेषराव धीवर माजी सरपंच श्री.तुकाराम गांगुर्डे माजी उपसरपंच श्री. बाळासाहेब काळे श्री. गंगाधर गोसावी अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला .नंतर ग्रामपंचायत कार्यालयापासून कलश यात्रा सुरुवात झाली ज्यांच्याकडे शेत जमीन आहे त्यांनी शेतातील चिमूटभर माती व ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांचे कडील चिमूटभर तांदूळ कलश मध्ये टाकले नंतर कलश यात्रा संपूर्ण गावात फेरी मारून समाज मंदिराकडे पोहोचली तेथे गावातील महिला व ग्रामस्थ श्री अतिश केदारे यांनी कलश पूजन करून सहभाग नोंदवला.
तसेच दि.२-१०-२०२३ रोजी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सौ. आरती ताई कडाळे उपसरपंच श्री. योगेश पवार ग्रामपंचायत सदस्य श्री.हरीभाऊ कडाळे मा. उपसरपंच श्री .बाळासाहेब काळे श्री. रामदास गांगुर्डे श्री .संदीप भाऊ कडाळे ग्रामपंचायत कर्मचारी श्री. संदीप शिरसाट श्री.संतोष भाऊ शिंदे ग्रामपंचायत महिला सदस्य अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवला तसेच ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात महादेव मंदिराजवळील परिसर, ग्रामपंचायत परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर, येथील ओला कचरा, प्लास्टिक कचरा सुका कचरा वेगळा करून सुयोग्य व्यवस्थापन केले यात मा. श्री भाऊसाहेब गांगुर्डे श्री मच्छिंद्र सुपेकर श्री संपतराव गुरगुडे श्री. जालिंदर सुपेकर श्री संदीप कडाळे सोसायटी कर्मचारी श्री संजय शिरसाठ ग्रामपंचायत कर्मचारी श्री . संदीप शिरसाट श्री.धनु भाऊ कडाळे ग्रामविकास अधिकारी श्री.शेषराव धीवर यांनी व माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विशेष परिश्रम घेतले.