राजापूरवाडीच्या विकासाला, भाजपा निधी कमी पडू देणार नाही ; पृथ्वीराज यादव मंत्री गिरीश महाजन यांच्या फंडातील 30 लाख रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ
प्रतिनिधी शितल कांबळे:

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला बिनविरोध लोकनियुक्त सरपंच निवडून देऊन भाजपाचे विजयी खाते उघडणाऱ्या राजापूरवाडीच्या विकासाला निधी कमी पडून देणार नाही. राजापूरवाडीला पावसाळ्यात महापूराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप येते, त्यामुळे या ठिकाणचा प्रभाग निहाय विकासाला न्याय देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. आगामी काळात रस्ते,गटारी, दिवाबत्ती आरोग्य,पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास करू. असे आश्वासन युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी दिले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या फंडातून आणि पृथ्वीराज यादव यांच्या प्रयत्नातून राजापूरवाडी येथे 30 लाख रुपयाच्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे व ग्रामपंचायतीच्या फंडातून अंतर्गत रस्ते करणे अशा संयुक्त बांधकामाचा शुभारंभ डॉ.जे.जे. मगदूम चारिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी यादव बोलत होते.
डॉ. सोनाली मगदूम यांनी, महापुराच्या काळात बेटाचे स्वरूप प्राप्त होणाऱ्या राजापूरवाडीतील रस्ते, गटारी मजबूत असण्याची आवश्यकता आहे आणि भाजप याकामी कुठेही कमी पडणार नाही. यापुढेही भाजपाकडून राजापूरवाडीसाठी निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे अभिवचन ग्रामस्थांना दिले.
यावेळी सरपंच रावसाहेब कोळी,उपसरपंच महादेवी पाटील,अभिजीत कोळी,निर्मला कोळी ,कांचन कोळी,सुरेश आबा पाटील
माजी सरपंच विजय एकसंबे,तंटामुक्त अध्यक्ष वाल्मीक कोळी, प्रदीप कोळी,श्रीकांत कोळी,अनिल रामगोंडा पाटील,प्रभाकर पाटील,दत्त भंडार संचालक मुनेर दानवाडे
महादेव चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.