दुष्काळी परस्थितीत शेतकरी हिताचे निर्णय घेणे गरजेचे असताना विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम थांबविले नाही

नायगाव – दुष्काळी परस्थितीत शेतकरी हिताचे निर्णय घेणे गरजेचे असताना विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम थांबविले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष बबनराजे लोहकरे यांनी दिला आहे.गोदा युनियन संस्थेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आज ( दि.२४ ) वडझिरे ( ता.सिन्नर ) येथे मार्गदर्शन करतांना दिला आहे.
संपूर्ण पावसाळा संपला तरी परिसरातील नदी नाले आजही कोरडेठाक असल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी सध्या दुष्काळी परस्थितीचा सामना करत आहे.अशा भयान परस्थितीत गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेने शेकडो थकबाकीदार शेतकऱ्यांना १५६ व १०७ च्या नोटीसा पाठविण्याचा सपाटा लावला आहे.त्यामुळे खो-यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.संस्थेच्या या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक होत असून आम्ही कर्ज भरण्यास तयार आहे.मात्र आम्हाला राष्ट्रीयकृत बँके प्रमाणे ओटीएस सवलत देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहे.सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना कुटूंबाचा गाडा चालविणेही कठीण झाले आहे.अशावेळी सभासद शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवून संस्थेने शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
थकबाकीदार शेतकरी सध्या कार्यक्षेत्रातील गावोगावी जाऊन सभासदाना आपल्या मागणी बाबत जनजागृती करत आहे.आज वडझिरे येथे झालेल्या बैठकीत गोदा युनियनचे ब्राम्हणवाडेचे माजी संचालक कैलास गिते,भास्कर ठोंबरे,प्रविण बोडके,सचिन गिते,संदिप दिघोळे आदीनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
फोटो ओळी – सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे गोदा युनियनने पाठविलेल्या जप्तीच्या नोटीसांविरोधात थकबाकीदारांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला आहे.यावेळी बोलतांना बबनराजे लोहकरे व सभासद