ताज्या घडामोडी

लासलगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. २५ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती लता तडवी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, तरुणाईचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद आणि समाजसेवेचे व्रत प्रत्यक्ष अंगीकारून कृतीवर विश्वास ठेवणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तरच्या आतापर्यंतच्या सर्व नियमित व विशेष हिवाळी शिबिरांबद्दल माहिती सांगितली तसेच हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महेक तांबोळी, साहिल जगताप, वैभव गुंजाळ, सुजित प्रसाद या स्वयंसेवकांनी ‘राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व’ या विषयावर आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नासिक जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तरचे विभागीय समन्वयक श्री.साहेबराव कासव यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी, समाजाबद्दल असणारी आस्था निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने 24 सप्टेंबर 1969 पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत असल्याचे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास स्वयंसेवकांसमोर मांडला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक कसा घडला जातो हे त्यांच्या अनुभवातून व विविध उदाहरणांच्या आधारे सांगितले.
तसेच याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याचं कार्य केले जाते. तसेच यावेळी त्यांनी स्वयंसेवकांना रासेयो च्या माध्यमातून चारित्र्य संवर्धन करून स्वयंस्फूर्तीने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका नम्रता राजोळे हिने केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हम सब मिलकर देश का अपने जग मे नाम जगायेंगे !
एनएनएस का परचम लेकर आगे बढते जायेंगे!!
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीतात म्हटल्याप्रमाणे लासलगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे + २ स्तर चे हे स्वयंसेवक रासेयो चा संदेश घेऊन भारत मातेचे नाव उंचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.