
दिनांक 30/08/2023 रोजी मा.श्री रविंद्र सिंघल साहेब ,अपर पोलीस महासंचालक (वा) म. रा. मुंबई, यांच्या संकल्पनेतून व मा.पोलीस अधिक्षक श्री डॉ मोहन दहीकर सर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, ठाणे मा.पोलीस उप अधिक्षक प्रादेशिक विभाग ठाणे श्री विजय डोळस सो.व मा.पोलीस निरीक्षक ठाणे श्री. बारवे यांचे मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त महामार्ग सुरक्षा केंद्र शहापूर हद्दीतील पडघा टोल नाका येथे मा. पोलिस उप अधीक्षक, महामार्ग पोलिस श्री. डोळस सो. यांचे उपस्थितीत महामार्ग पोलीस मदत केंद्र शहापूर कडील अधिकारी Api डांगे सर Psi शेख सर Asi पाटील पो. हवालदार ज्ञानेश्वर सांगळे पो.ना नितीन पाटील पो. काँ. सनस तसेच इतर कर्मचारी यांनी दुचाकी व चारचाकी वाहन चालक यांना सुरक्षेची राखी— सुरक्षेचे बंधन “हेल्मेट वापरा सुरक्षित रहा” — “सीट बेल्ट वापरा सुरक्षित रहा” असा लिखित संदेश असणारे महामार्ग सुरक्षा विभागाचे हाताचे बँड व राखी बांधून महामार्ग वरून प्रवास करताना घ्यावयाची काळजी व वाहतूक नियम पालन संधर्भात जनजागृतीपर मार्गदर्शन प्रबोधन केले. सदर कार्यक्रमास महामार्गावरून जाणारे प्रवासी व स्थानिक परिसरातील नागरिक उपस्थित होते.