निफाड तालूक्यात तातडीने दुष्काळ जाहिर कारावा व शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी मुख्यमंत्री यांच्याकडे शिवसेना तालुका समन्वयक केशवराव जाधव व शेतकरी बांधवांची मागणी
संपादक सोमनाथ मानकर

या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच लपंडाव सुरू केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात
पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त
झाला आहे.ऑगस्ट महिना गेला सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही यामुळे खरीप पिके पुन्हा धोक्यात
येवुन पाण्या अभावी जळत आहे.भरपावसाळ्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
किड्यांना पोषक वातावरण असल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होत आहे खरीप
पिक पुर्ण वाया गेल्याची परिस्थीती निर्माण झाली आहे,सप्टेंबर सुरू झाला तरी सर्व विभागात पावसाचे प्रमाण
80 टक्क्या पेक्षा कमी आहे हि परिस्थीती अतिशय भिषण असुन पिके हातातून निघुन गेले आहे त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून
शेतकर्यांना सरकारने पिक विम्याच्या लाभासह सरसकट आर्थिक मदत देऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना
तालुका समन्वयक केशवराव जाधव ,ग्रामपंचायत सदस्य राम बोराडे ,अरविंद शिंदे ,शंकर चव्हाण, रोहित पठारे,
संतोष पवार, ह भ प,बाळासाहेब शिरसाठ,नामदेवराव शिंदे,बापुसाहेब मोकाटे, संदीप दरगुडे ,दत्तू घोडे ,जालींदर शिंदे, संजय घोडे ,विश्वनाथ कुठे, सुफियान शेख बांधव उपस्थित होते निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पालकमंत्री दादाजी भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ जिल्हाधिकारी नाशिक तहसीलदार निफाड यांना पाठवण्यात आले आहे