ग्रामपंचायत भाटगाव ता.चांदवड येथे हुतात्मा स्मारकाचे अनावरण करून 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

आज 77 वा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने ग्रामपंचायत भाटगाव ता. चांदवड येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकाचे अनावरण भाटगाव च्या माननीय सरपंच सौ.हिराबाई पगार व उपसरपंच श्री.किरण भवर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, भाटगाव ही जन्मभूमी असलेले भारतीय सैन्य दलातील माजी नायब सुभेदार माननीय राजाराम गंगाधर पोटे,आता सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाटगाव येथील आजी-माजी सैनिक व पोलीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.