के के वाघ शिक्षण संकुल काकासाहेब नगर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा.
प्रतिनिधी श्री .ज्ञानेश्वर भवर

के के वाघ शिक्षण संकुल काकासाहेब नगर रानवड येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली.
डॉ. बी. एल. जाधव यांनी आपल्या मनोगतातून आपण आपल्या राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो. त्याअनुषंगाने आपण राष्ट्रहित जपत देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद कदम यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू करण्याची जबाबदारी ही पुढील पिढीची असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर पूनम अष्टेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी रानवड पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, रामनाथ अण्णा पानगव्हाणे, मा. सुधाकर आहेर, रामभाऊ पाटील, रघुनाथ दादा कोल्हे, डॉ अतुल गवारे, शिक्षक, शिकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.