कै.माणिक रघुनाथ मढवई विद्यालय कोटमगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर भवर

दि.१५/०८/२०२३ रोजी. माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पी.आय श्री.राहुलजी वाघ साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच श्री. योगेश बाळासाहेब पवार हे होते .गावच्या सरपंच सौ आरतीताई कडाळे माजी. सरपंच श्री.तुकाराम गांगुर्डे, श्री विलासराव सोमवंशी ,श्री मोतीराम पवार,यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या, सरस्वती मातेचे व मढवई सर (संस्थापक अध्यक्ष ) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व.ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. कार्यकर्माच्या सुरुवातीस मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीची वाटचाल सांगितली. मान्यवरांचे स्वागत श्री. अमोल मढवई (संस्थेचे अध्यक्ष),श्री.प्रतिक
मढवई, (संस्थेचे सचिव)श्री.विलासराव सोमवंशी, संस्थेचे संचालक श्री मोतीराम पवार संस्थेचे सचालक,यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. पोलीस निरीक्षक एपीआय श्री. राहुल
वाघ साहेबांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातील उदा.देऊन अमूल्य असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना. त्यांच्यावर चांगले संस्कार,व्हावे यासाठी बोधपर चित्रपट शाळेने दाखवावे असेही वाघ साहेब यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्या वतीने स्थापन केलेल्या अनुलोम संस्थेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 350 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने अनुलोम संस्थेचे सदस्य श्री. बापू मोरे,श्री. कैलास शिरसाट श्री. ज्ञानेश्वर भवर यांच्यातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. जेणेकरून आपले हिंदू धर्माचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचावेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे.
तसेच विद्यालयातील गुणवंत शिक्षक. श्री गलांडे सर यांनी एम. ए. परीक्षेत चांदवड कॉलेज मध्ये ८२:८१ % गुण मिळऊन सर्व विषयात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच
श्री. गांगुर्डे सर यांनीही एम ए.परीक्षेत फर्स्ट क्लास मिळून पदवी प्राप्त केली. मा.श्री. राहुल वाघ साहेब (सहाय्यक पोलिस निरीक्षक)यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थी कू प्रणिती साप्ते
कु.समिक्षा गांगुर्डे, कु. प्राची देवरे,कु. प्रणिती सापते ,कु.पायल शिरसाठ व इतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. गांगुर्डे सर श्री .केदारे सर श्री .जयेश कदम सर ,श्री. दिवटे सर श्री .देवडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.