
जळगाव शहरात विसनजी नगरातील कॅनरा बँकचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांनी जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँक एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या प्रयत्न केला. असल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पेठ चे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांचे मार्गदर्शन खाली या गुन्हाचा तपास हे.का. फिरोज तड़वी यांच्याकडे देण्यात येऊन त्यांनी अज्ञात आरोपींच्या शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीनुसार आयोध्या नगरातील संशयित आरोपी विशाल गोकुळ राजपुत रा. आयोध्या नगर जळगाव याला ताब्यात घेतले आहे. यावेळी हे. कॉ फिरोज तड़वी यांच्यासोबत जिल्हा पेठच्या डीबी पथकातील अंमलदार पोलीस नाईक जुबेर तड़वी, व पोलीस नाईक अमित मराठे यांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले असता त्याने त्याच्या साथीदारांच्या नमूद चा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनांक ५ रोजी त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या एका संशयित आरोप आमच्या शोध पोलीस करीत आहे पुढील तपास पोलीस हवालदार फिरोज तड़वी हे करीत आहे