शाळेच्या पहिल्या दिवशी आपापल्या शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात
ज्ञानेश्वर पोटे

नवीन शैक्षणिक वर्ष २०२३- २४ .या नवीन शैक्षणिक वर्षात सर्व नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी आपापल्या शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.त्याच प्रमाणे भाटगांव येथील शाळेत अनोख्या पद्धतीने विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस म्हणजे आपल्या जुन्या व नवीन मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या गुरुजनांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. उज्वल भविष्य,उत्तम संस्कार,चारित्र्य, घडविणाऱ्या सरस्वतीच्या मंदिरात दीर्घ सुट्टीनंतर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा आतुरतेने आपली वाट पहात आहे. अशा आशयाचे ‘स्वागतोत्सवाचे’ शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटन नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक. शाळेचे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी रेखाटले आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय सानप, पर्यवेक्षक,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.