ताज्या घडामोडी
जि.प.सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा साईनगर [पिंपळगाव बसवंत ] शाळेत प्रवेशोत्सव साजरा…..
मनोहर देसले / प्रतिनिधी

- आज दि:-१५ जून २०२३ रोजी साईनगर या प्राथमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम धूमधडाक्यात संपन्न झाला.सदर कार्यक्रम प्रसंगी इ.१ली च्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन त्यांचे पाऊलांचे ठसे घेतले , सर्व विद्यार्थ्यांना choklet व गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत करण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नागपुरकर मॅडम सर्व शा.व्य.समिती सदस्य , नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री.केशवनाना बनकर ,श्री.विनायक खोडे , गायकवाड सर,ठोंबरे सर व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी परिसरातील बहुसंख्य माता व पालक उपस्थित होते.प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.निला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री.उशीर सर,अहिरे सर यांनी केले असून श्री.पानसरे सर,श्रीम.शालिनी वाघ,श्रीम.सुनिता वाटपाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.अशा पद्धतीने शाळेचा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.