अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ह.भ.प गोरक्षनाथ शिंदे महाराज यांनी वयाच्या 63 व्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.
उपसंपादक - रेणुका पगारे

दिनाक15 डिसेंबर 2022, ते दिनांक 16 एप्रिल 2023, या कालावधीमध्ये म्हणजे सुमारे चार महिने, (123 दिवस) अनवाणी पायाने चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांचे स्वप्न, त्यांनी निर्विघ्नपणे सुखरूप साकार केले. व अतिशय उत्सवात व आनंदात ही नर्मदा परिक्रमा वयाच्या 63 व्या वर्षी पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे महाराज, यांनी ओंकारेश्वर येथून दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी सुरुवात केली. व मोठ्या आनंदात व उत्साहात ही परिक्रमा पूर्ण करून सुमारे (123 दिवस) पायी चालत ही परिक्रमा पूर्ण करून पुन्हा ओंकारेश्वर येथे येऊन परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रवास थांबविला. त्यांचा हा अभेद संकल्प अनुभव हा खरोखर कौतुकास्पद असून ही परिक्रमा पूर्ण करत असताना त्यांना अनेक प्रकारचे चमत्कारिक अनुभव आले. ही परिक्रमा पूर्ण केल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी त्यांनी 27 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या बहिणीच्या मुली म्हणजेच सर्व भाच्यांना बोलवून, त्यांचे पाय धुवून पंचोपचार पूजा करून, त्यांना सर्वांना साडीचोळी देऊन, त्यांचा मानसन्मान केला. हा सर्व कार्यक्रम अतिशय संस्कारीक पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ह.भ.प बाल योगी ऋषिकेश महाराज यांचे कीर्तन झाले. आणि त्यानंतर विधीयुक्त कार्यक्रमाची सांगता करून ब्राह्मण भोजन व इतर जमलेले सर्व नातेवाईक व पाहुण्यांना स्वादिष्ट भोजन देऊन सर्वांचा सत्कार करून थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले.