-
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पिणार तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही असे उद्गार संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले,त्याप्रमाणे शिक्षणाची ओढ प्रत्येकापर्यंत पोहोचावी प्रत्येकाला शिक्षण मिळावे, शिक्षणाने माणूस ओळखला जावा ,शिक्षणाने माणसाची आर्थिक सामाजिक सांस्कृतिक प्रगती व्हावी, हा उद्देश ठेवून वेळापूर ता. निफाड जि.नाशिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शाळा पूर्व तयारी क्र.1 उत्सुकतापूर्वक उपक्रम राबवत आहे .या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेमध्ये नव्याने येणारे विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल वाढणारी गोडी, आवड ,आणि छंद हा वाढावा ,तसेच मुलांमध्ये असलेली बुद्धिमत्ता याचे अवलोकन करून त्यांना कोणत्या विषयात रस आहे,याचे मूल्यमापन या पूर्वतयारी मधून दिसून येते व शाळेबद्दल मुलांना असलेली भीती दूर व्हावी हाच एक उद्देश त्यांनी यामध्ये ठेवला आहे .
जून मध्ये शाळा सुरू होणार आहे. मुलांची प्रवेश घेण्याची तयारी सुरू असताना पुन्हा शाळा पूर्व तयारी उपक्रम क्र 2 घेण्यात येणार आहे . पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश द्यावा असे जाहीर आवाहन मुख्याध्यापक श्री. सचिन शेलार सर यांनी केले.
पालकांचा खाजगी शाळांकडे कल जास्त प्रमानात वाढला आहे याचे कारण तेथे असणारी उपक्रम पद्धत या मुळे पालक आकर्षित होतात. म्हणून आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम आम्ही घेत असून जसे की दप्तर मुक्त शाळा , शाळा प्रश्नमंजुषा ,वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, पर्यावरणयुक्त शाळा, सांस्कृतिक कार्यक्रम,योगासन, स्नेहसंमेलन, मुलांचा निरोप समारंभ आणि प्रवेश सोहळा हे उपक्रम राबविले आहेत.असे शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती भावसार मॅडम यांनी सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश कुटे,उपाध्यक्ष जालिंदर भागवत,विलास गरुड, अड.शुभांगी शिंदे,केदू बदामे, जगन बदामे,संगीता लहाने, किशोर डावरे,सुमन शिंदे,पगारे मॅडम,व इतर पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश
policetimesnews24x7
Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.