लासलगाव येथे भारतीय मजूर संघाची शाखेची स्थापना. लोकनेते दत्ताजी पाटील बँकेत पहिल्या शाखेचे अनावरण
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव – लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेत भारतीय मजूर संघाची शाखा स्थापन करण्यात आले असून याप्रसंगी भारतीय संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढोमणे ,दिलीप पेंढारकर ,नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी,क्षावण जावळे, धीरज परदेशी , शशिकांत मोरे ,केशवराव जाधव, नामदेवराव शिंदे प्रमुख उपस्थित होते याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले असून याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना अभिवचन देण्यात आली की कर्मचाऱ्यावर जर संस्थाचालक अन्याय करीत असेल तर भारतीय मजूर संघ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत असून त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली असून सर्व कर्मचाऱ्यांचा लवकरात लवकर पगार वाढ वेतनश्रेणी महागाई भत्ता देण्यात यावी अशा प्रकारचे प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच शिवसेना तालुका प्रकाश पाटील यांनी देखील शिवसेना ही न्याय व हक्कासाठी स्थापन झालेली आहे त्यामुळे बँक कर्मचारी बांधवांवर अन्याय झाल्यास सर्व शिवसेना त्यांच्या न्याय व हक्कासाठी सोबत उभी राहिली अशी ग्वाही दिली आहे यावेळेस लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जिल्हाभरातून असंख्य मजूर युनियनचे सदस्य उपस्थित होते