. माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

सविस्तर वृत्त असे की. आज दिनांक 29 .4. 2023 रोजी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. माणिक रघुनाथ मढवई यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रथमता सरांच्या पवित्र प्रतिमेचे मुख्याध्यापिका श्रीमती. मढवई मॅडम. संस्थेचे चेअरमन श्री. प्रतीक माणिक मढवई श्री. गलांडे सर, श्री. केदारे सर, श्री दिवटे सर, श्री ज्ञानेश्वर देवढे यांनी पूजन केले. सूत्रसंचालन श्री. गलांडे सर यांनी केले. मढवई सर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शालेय कामकाज निष्ठेने करण्याचा निर्धार याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी केला. सरांच्या स्मृती प्रथम स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कै. मढवई सर यांना श्रद्धांजली वाहून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री. गलांडे सर. श्री केदारेसर श्री. गांगुर्डे सर यांनी सरांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले श्री. दिवटे सर श्री. देवडे ज्ञानेश्वर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी कुमार गणेश काळे व इतर विद्यार्थिनी आपल्या मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ निफाड तालुका सह संघटक, न्यायभूमी न्यूज प्रतिनिधी, पोलिस टाईम्स24/7 प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर यांनी कै. माणिकराव रघुनाथ मढवई सरांमुळे गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केलेल्या उपकाराची जाण कोटमगाव कधीही विसरू शकत नाही. सर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर कोटमगाव ग्रामस्थ हे आपल्या सुख दुःखात कायमस्वरूपी उभे राहतीलअशी ग्वाही दिली.