मैत्री ग्रूप रुकडी यांच्या पाचव्या वर्धापदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

हातकणंगले तालुक्यातील रूकडी येथील मैत्री ग्रूप यांच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून केली. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, अतिशय उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला असून रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी करायचं हाच हेतू समोर ठेवून या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केले, मैत्री ग्रूप च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी उपक्रम राबविण्यात येत आहेत यामध्ये प्रामुख्याने विध्वा प्रथा बंद करणे यापासून ते गरीब व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले आहे असं यावेळी उपस्थित सदस्या शोभा शिंगे, तसेच सुनीता हनीमनाळे सरोजिनी मंच कोल्हापूर अध्यक्षा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्या म्हणाल्या मैत्री ग्रूप चे कार्य उल्लेखनीय आहे प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी उपक्रम राबविले जातात मला अभिमान वाटतो असे तोंडभरून कौतुक त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आभार भारती गायकवाड यांनी मानले, सदर उपक्रमास जीवनधारा ब्लड बँक यांचे मार्गदर्शन लाभले, उपस्थित डॉ विशाल नाईक, आदिती मोहिते , सुचिता गायकवाड. संजीवनी जरग , संतोष हळगे , प्रसाद भिंडगे यांचे मोलाचे योगदान लाभले,यावेळी उपस्थित सर्व सदस्य, मैत्री ग्रूप च्या अडमिन भारती गायकवाड, सरपंच राजश्री रुकडीकर, पोलिस पाटील कविता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सुजाता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या आस्मा बडेखान, शोभा शिंगे, सुलोचना कांबळे, मनीषा कांबळे, दुर्गा कांबळे, गीता शिंदे, सुनीता कांबळे, अश्विनी खुडे, पद्मावती गायकवाड, वंदना कांबळे, सीमा गायकवाड, जनार्दन गायकवाड, रमामाता फाउंडेशन अध्यक्ष मोहन मोहन चव्हाण, संजय कांबळे, संतोष रुकडीकर, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.