शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालाचे मार्केटिंग केले पाहिजे- डॉ. प्रताप दिघावकर जय किसान फार्मर्स फोरम तर्फे 30 शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान
अजिज खान पठाण

नाशिक-
शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालाचे मार्केटिंग केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी केले. जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त झालेल्या कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कृषी शास्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिवाजी महाराज लोकविद्यापीठाचे महा संचालक डॉ. मंगेश देशमुख, इफकोच्या संचालिका साधना जाधव, मुंबई आकाशवाणी चे डॉ. संतोष जाधव, गोरकभाऊ बोडके, राजू गावंडे, पांडुरंग चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा मेडल, ट्रॉफी, सन्मान पत्र, पैठणी साडी, व शेतकरी गौरव विशेषांक देवून सपत्निक सन्मानित करण्यात आला. तसेच यावेळी सुभाषराव शिंदे यांना शिवाजी महाराज लोकविद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सोशल सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘शेतकरी गौरव विशेषांक’ व ब्रिगेडियर सुधीर सावंत याच्या ‘थर्ड आय’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. म्हणाले की जगभरात अनेक शोध लागलेले आहेत पण ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी प्रास्तविक केले.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये रविंद्र गोरडे, कृष्णा मापारी, केदू बनकर, डॉ. प्रशांत नाईकवाडी, अनुप नाकट, सिध्दार्थ केदार, बापू वाघ, सतीश खाडे, समाधान पानगव्हाने, रविंद्र गारे, शरद पुंड, पोपट जाधव, अतुल मुळे, अक्षय वाघ, बाळासाहेब काकडे, श्रीकृष्ण हायटेक नर्सरी, विष्णु गवंडे, सुरेश नाठे, फामृत, दत्तू निकम, दादाजी शिंदे, भागीनाथ आसने, दिलीप पाटील, विलास शिंदे, भाऊसाहेब झोमण, मिथुन काळे, चेतन गांगुर्डे, सागर निकाळे, शंकर गावीत, विष्णु माळी यांचा समावेश आहे
यावेळी ” प्रसिद्ध गायिका रेखा महाजन व सुखदा महाजन यांनी मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तुषार वाघुळदे यांनी सूत्रसंचलन केले तर गोरक्षनाथ जाधव यांनी आभार मानले.