नादंगाव रेल्वे स्टेशन येथे जनता एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, कामयाणी एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे
अजिज खान पठाण

नादंगाव रेल्वे स्टेशन येथे जनता एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, कामयाणी एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पुर्वरत झाल्याबद्दल मा. ना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ भारती ताई पवार यांच्या हस्ते कामयाणी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी समस्त नांदगावकरांनी अनेक दिवसाची मागणी पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी,केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे जी यांचे आभार मानले.
यावेळी जेष्ठ नेते जयश्रीताई दौंड,सजनराव कवडे,गणेश शिंदे,दत्तराज छाजेड,बापू शिंदे,राजाभाऊ बनकर, सागर फाटे,सूनिल जाधव, उमेश उगले,संजय सानप,राजु आहेर, भावराव निकम, डाॅ. आहेर,देवीदास मोरे, राजाभाऊ पवार,अभय देशमुख,कपिल तेलूरे,सुनिल जाधव,बबलू सय्यद, तुषार पांडे तसेच शिंदे गटाचे भारती मोरे, सुनील जाधव यांच्यासह रेल्वे प्रशासन पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.