कोटमगाव येथील वर्षानुवर्ष चालत आलेल्या यात्रेची प्रथा कायम————-
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर कोटमगाव

निफाड. तालुक्यातील कोटमगाव ची वेगवेगळ्या स्वरूपाच्या इतिहासाची ठेव आहे. तो ठेवा एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे जोपासण्याचे, जतन करण्याचे कार्य त्या त्या कुटुंबावर जबाबदारी असते त्यापैकीच कोटमगाव हे आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,कोटमगाव मध्ये भव्य दिव्य अशी यात्रा ही चैत्री पौर्णिमेला भरते. त्यामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात त्यासाठी गाव पातळीवरील नागरिक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन तथा पंचक्रोशीतील सर्वांच्या सहभागाने एकत्र येऊन यात्रेच्या कार्यक्रमासाठी दिवस रात्र एकत्र कार्य करतात तसा यात्रेचा एक इतिहास आहे कोटमगाव गावामध्ये रोकडेश्वर महाराज मंदिर आहे .
तसेच खंडेराव महाराज मंदिर या दोन्हीही देवांच्या मंदिरास दिव्यांची रोषणाई करून मोठ्या जल्लोषात यात्रा उत्सव व हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो या यात्रा सोहळ्याचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते पहाटे कोटमगाव वारकरी संप्रदाय यांनी तसेच कोटमगाव ग्रामस्थ एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यापैकी गावातील कावाडी मिरवणुकी केली जाते ही मिरवणूक गंगेचे पाणी आणून कावड तयार करून ते पाणी पूर्ण गावात मिरवतात संपूर्ण देवतांना या पाण्याची स्नान घालतात यासाठी कावाडीचा मानकरी ठरवला जातो हा मान काळे कुटुंबाने म्हणजेच कोटमगाव ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष श्री बाळासाहेब काळे यांनी मिळवला हा मान मिळून संपूर्ण गावात कावड नृत्य सादर करण्यात आले त्यासाठी मिरवणुकीस सांस्कृतिक नंदी नृत्य मंडळ व मोर नृत्य श्री राजू अहिरे मू. माळीवाडे (गणेश नगर) पो. मुल्हेर ता. सटाणा जि. नासिक यांना आमंत्रित करून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच या यात्रेदरम्यान बारा गाड्या ओढण्याची प्रथा आहे पंचक्रोशीतील बारा गाड्या उडणारे मानकरी हे ७ दिवसाचा उपवास पकडून खंडेराव महाराज मंदिरात बसून ७ दिवस सकाळ संध्याकाळ खंडेराव महाराज गायन , जागरण गोंधळ करतात नंतर आपल्या आराध्य दैवत असेच गावातील चारही बाजूने असणाऱ्या देवस्थानाला श्रीफळ फोडून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सायंकाळी ४.३० ते ६.००वाजता पार पाडतात यात यावर्षी श्री काशिनाथ लक्ष्मण गांगुर्डे व श्री रामभाऊ कारभारी गांगुर्डे यांनी बारा गाड्या ओढण्याचा मान घेतला याप्रसंगी पंचक्रोशीतील हजारो भाविक एकत्र येऊन खंडेराव महाराजांचे आशीर्वाद घेतात यानंतर कोटमगाव मधील शिवरत्न ग्रुप व यात्रा कमिटी ग्रामस्थ एकत्र येऊन हनुमानाचे रथ तयार करून भव्य मिरवणूक काढतात यात श्री पप्पू वैद्य यांनी हनुमानाचे रूप धारण करून रथयात्रेत सहभाग घेतला ही रथ यात्रा ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावात मिरवण्यात आली .लोकनाट्य तमाशा कार्यक्रम रात्री ९.३० वाजे पासुन २.०० पर्यंत ठेवण्यात आला होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे खंडेराव महाराजांचे मंदिर समोर हजऱ्या होऊन दुपारी ३.०० वा बैलगाडा शर्यत भरण्यात आल्या यात १०००पासुन ते ६००१ रुपयांपर्यंत देणगी देण्यात आले तसेच बैलांची साजही देणगी स्वरूपात देण्यात आले . यात नारायण टेंभी येथील बैल गाडीने ६००१ रुपयाची देणगी मिळवली. अशा प्रकारे संपूर्ण कोटमगाव ग्रामस्थ यात्रा कमिटी व पंचक्रोशीतील भाविकांनी येणाऱ्या हॉटेल दुकानदार खेळणी दुकानदार या सर्वांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ न देता भांडण तंटे न करता यात्रेचा मनमुराद पणे आनंद घेतला आणि घेऊ दिला कोटमगाव चे सरपंच सौ. आरती संदीप कडाळे उपसरपंच श्री. योगेश बाळासाहेब पवार यात्रा कमिटी अध्यक्ष श्री .बाळासाहेब दादासाहेब काळे यात्रा कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आजी, माजी ,सरपंच ,उपसरपंच, शिवरत्न ग्रुप, कोटमगाव सार्वजनिक शिवजयंती सदस्य मित्र मंडळ , कोटमगाव भाविक भक्त, पंचक्रोशीतील भाविक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले