श्री क्षेत्र सप्तशृंगी गड आई भगवतीच्या शिखरावरती ध्वज लावणारे मानकरी कोण भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये संभ्रम
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी आई भगवती च्या शिखरावर गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा कळवन तालुक्यातील दरेगाव येथील गवळी परिवार फक्त आणि फक्त त्याच परिवारातील सदस्य आई भगवतीच्या शिखरावरती जाऊन ध्वज लावण्याचा काम करत आहे
देवी संस्थान मध्ये ध्वजाची विधीवत पूजा केली जाते या पुजे मध्ये शिखरावरती ध्वज लावणारे दरेगाव येथील गवळी परिवारातील मानकरी देवी संस्थान विश्वस्त मंडळ पदाधिकारी कर्मचारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात
गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्यापासून दरेगाव येथील गवळी परिवार आई भगवतीच्या शिखरावर ध्वज लावण्याचे काम करत आहे परंतु दिनांक १/४/२०२३ या दिवशी दैनिक लोकमत धुळे या पेपरमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली होती की ध्वज लावण्याचा मान यंदाही शिरपूरकरांना या आशियाची बातमी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामुळे सदर बातमी ही पूर्णतः चुकीची व दिशाभूल करणारी आहे यामुळे भाविकांमध्ये गडावरील ग्रामस्थ यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला असून गडावरील ग्रामस्थांमध्ये सुद्धा नाराजीचा सुर दिसून आले श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर ती आई भगवती शिखरावर ध्वज लावणारे मौजे दरेगाव येथील गवळी कुटुंब आहे याच्या व्यतिरिक्त इतर कोणाचा काही संबंध नाही यामुळे सदर बातमी बाबत सकल चौकशी करावी असे आशियाचे पत्र ग्रामपंचायत सप्तशृंगी गड यांनी पोलीस निरीक्षक कळवण पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहे व सोबत दैनिक लोकमत धुळे वृत्तपत्राची झेरॉक्स सुद्धा जमा केलेले आहे व असेच पत्र सप्तशृंगी देवी संस्थानला सुद्धा दिलेले असून याबाबत देवी संस्थाने सुद्धा आपले पत्र प्रसिद्ध केलेले आहे की फक्त दरेगाव तालुका कळवण येथील गवळी परिवारातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या शिखरावरती ध्वज लावतात इतर कुनिही व्यक्ती ध्वज लावत नसल्यामुळे कुठल्याही आफवा वरती विश्वास ठेवू नये असे असे पत्र सप्तशृंगी ग्रामपंचायत सप्तशृंगी गड व देवी संस्थान सप्तशृंगी गड यांनी प्रसिद्ध केले असून भाविकांना आवाहन केलेले आहे.
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर ती आई भगवतीची चैत्र उत्सव यात्रा ३०/३/२०२३/ते ६/४/२०१२ या कालावधीमध्ये असून दिनांक ४/४/२०२३ रोजी आई भगवतीच्या शिखरावरती ध्वज लावण्यात येणार आहे
चौकट.. श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील आई भगवती च्या शिखरावरती ध्वज लावण्याचा मान आमच्या परिवाराला असून कोणीही याबाबत चुकीचे प्रसिद्धी करू नये अन्यथा गवळी परिवाराच्या वतीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल या गोष्टीचा सुद्धा विचार करावा सोमनाथ गवळी ध्वजाचे मानकरी दरेगाव