सहजयोग – एक संक्षिप्त परिचय

‘सह’ + ‘ज’ + ‘योग’ अशा या तीन शब्दांची युती करून ‘सहजयोग’ हा शब्द बनला आहे.
‘सह’ म्हणजे आपल्या बरोबर
‘ज’ म्हणजे जन्मलेल्या
‘योग’ म्हणजे युती
सहजयोग या शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे – आपल्या ‘सह’ जन्मलेल्या ‘ज’ अशा कुंडलिनी शक्तीचा परमेश्वरी शक्तीशी ‘योग’.
परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आजपावेतो मानवाने त्या त्या काळानुसार नाना प्रकारे प्रयत्न केले आहेत.
भक्तीयोगात भक्ती मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचणे सुलभ होते.
ज्ञानयोगात ज्ञान मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचणे सुलभ होते.
कर्मयोगात परमेश्वराला सर्व कर्मे अर्पण करीत म्हणजे फळांची अपेक्षा न करता अकर्म कर्म करीत परमेश्वरापर्यंत पोहोचणे सुलभ होते.
तसेच सहजयोगात आपल्या ‘सह’ जन्मलेल्या कुंडलिनी शक्तीच्या मदतीने परमेश्वरापर्यंत पोहोचणे सुलभ होते.
सहजयोगात सहस्त्रारी चित्त एकाग्र करून निर्विचारितेत ध्यान केल्याने सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन कार्यान्वित होते.
कुंडलिनी जागृतीची अनुभूती सहजयोगाच्या संस्थापक प.पू. श्री माताजी निर्मला देवी यांनी १९७० पासून देण्यास सुरुवात केली. याचा लाभ देशातील व परदेशातील लाखो सहजयोगींनी घेतला आहे.
नाशिक शहरात गोल्फ क्लब ग्राउंड वर २ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता होणार असलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ध्यान धारणा करीत आपले जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना सहजयोगाची अधिक माहिती मिळू शकते.