
नाशिक : ओम नमो सद्गुरू सद्सन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ओम चैतन्य श्री मच्छिद्रनाथ महाराज समाधी दिन व गुढीपाडव्यानिमित्त इंदिरानगर ते कलानगर सिग्नलपर्यंत सवाद्य दिंडी काढली होती. यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी लातूर येथील महंत श्री श्री श्री १००८ सोमवार नाथजी महाराज, तुळजापूर येथील सिद्ध गरिबनाथ मठाचे महंत योगी मावजी नाथजी महाराज, खेडगाव येथील महंत योगी समशेर नाथजी चौफुला, गोरखपूर येथील योगी शैलेंद्र नाथजी (शास्त्री), त्र्यंबकेश्वर येथील विश्वनाथजी महाराज आदिनाथ आखाडा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी ओम नमो सद्गुरू सद्सन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी प्रवीण भालेराव, चारुदत्त गुजर, रवि लांडगे, भास्कर दोंदे, प्रतीक पगारे, रोहन राजपूत, तुषार भालेराव, प्रतीक गरुड, पवन कुमावत, संतोष शिकारे, श्रीकांत गोसावी आदींनी प्रयत्न केले. कलानगर येथून दिंडी मढी येथे रवाना झाली.