ताज्या घडामोडी

ना.जि.म.स. बँक.लि.नाशिक जाचक वसुली थांबवणे संदर्भात शेतकरी बांधवांचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना साकडे.

मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव…
नाशिक जिल्ह्यात बऱ्याच भागात गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष,कांदा, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पिक उभे करण्यासाठी केलेला खर्च देखील पदरात पडणे मुश्किल आहे.अशा परिस्थितीत ना.जि.म.स. बँक ही शेतकऱ्यांकडून जुलमी व सक्तीची वसुली करत आहे.शेतकऱ्यांच्या ७/१२ वर बँकेचे नाव दाखल करून १००/८५ च्या अपसेट प्राईजच्या नोटीसा अतिशय घाई घाईने देण्यात येऊन,शेतकऱ्यांचे नावे ही वृत्तपत्रात देऊन मानहानी करून जमिनीचे लिलाव करीत आहे. तरी सदर प्रकार त्वरित थांबवण्याचे आदेश जिल्हा बँकेला द्यावे व राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे 0ts योजना लागू करून व्याज माफ करावे ही विनंती करण्यात आली.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये देखील साडेसहा हजार शेतकरी यांच्या जमिनीच्या लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. सदर प्रश्न मा.आमदार अनिल जी देशमुख यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता त्या प्रश्नास उत्तर देताना मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की असे शेतकऱ्यांना अपमानित करता येणार नाही त्यांनी तत्काळ बँकेना आदेश देण्यात येतील अशी घोषणा विधानसभेमध्ये केली व जमिनीचे लिलाव प्रक्रिया ताबडतोब थांबविण्यात येईल असे आश्वासन दिले.त्याच धरतीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव प्रक्रिया थांबवण्याचे आदेश हे ना.जि.म.स.बँकेस संबंधीतांनी देऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे लासलगाव येथून चांदवड कडे जात असताना लासलगाव बस स्थानक येथे शेतकरी बांधवांनी केली.यावेळी कृषी मंत्री यांनी मुंबई येथे गेल्यावर तात्काळ मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री महोदय यांना वरील माहिती देवून तात्काळ शेतकरी वर्गाला दिलासा देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन शेतकरी बांधवांना दिले.सदर निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील ,बाळासाहेब होळकर, रविराज बोराडे, केशवराव जाधव, संदीप पवार ,दत्तात्रेय मुद्गुल, साईनाथ मुद्गुल, दत्तात्रय सुडके, भगवान बोराडे, शिवा ढोमसे यांसह लासलगाव पंचक्रोशीमधील अनेक युवा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.