
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इतिहासात पहिल्यांदाच मार्च अखेरीस रहाणार सुरू .कांदा व्यापारी असोसीएशन कडून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद
मा.मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब, व मंत्रिमंडळाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत खरीप लाल कांदा अनुदान योजना,(प्रती क्विंटल 350 रु) जाहीर केले आहे. परंतु आपण व्यापारी बांधव मार्च वर्ष अखेर ला बँका बंद असल्यामुळे लिलाव प्रक्रिया चार ते पाच दिवस बंद ठेवतात . तरी 27 मार्च मंगळवार रोजी कांदा अनुदान जाहीर झाले असल्यामुळे यामुळे अनेक शेतकरी बांधव आपला कांदा 31 मार्च अखेर पर्यंत विकू शकणार नाही.यामुळे त्यांना शासनाचे कांदा अनुदान मिळणार नाही. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.तरी आपण सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की कांदा लिलाव प्रक्रिया ही ,30 ,31 मार्च या दिवशी सुरू ठेवून शेतकरी बांधवांच्या हितासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील ,जनार्दन,पवार,केशवराव जाधव,राम बोराडे, राहूल शेजवळ,चैतन्य पवार,आदि शेतकरी बांधवांनी केली असता त्या वर व्यापारी असोसीएशन च्या पदाधीकार्यांनी तातडीने बैठक घेवुन 30 तारखेला (गुरूवार) दुपारी 1 वाजे पर्यंत व 31 तारखेला (शुक्रवार) बँका बंद असून देखील कांदा मार्केट सुरू ठेवून शेतकरी बांधवांच्या हितासाठी ऐतिहासीक निर्णय घेतला या वेळी कांदा व्यापारी पुरशोत्तमशेठ चोथानी,बाळासाहेब दराडे, मनोज़ जैन, प्रवीण कदम, अनिल अब्बड,ऋषभ राका,संदीप सिन्हा , राकेश शिंदे, धनंजय शिंदे, दत्तु खाडे, सोनू केदारे,जीवन पगारे,विलास गुंड पाटील,नाना कोकणे,कांदा मार्केट चे निरीक्षक काकासाहेब जगताप,संदिप निकम,गौरव निकम,राहुल शेजवळ,सचिन जोशी,शेतकरी बांधव व कांदा मार्केट कमेटीचे कर्मचारी बांधव उपस्थित होते.