शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेणार नसल्याचे आश्वासन.
नाशिक प्रतिनिधी

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे. राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीता आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एससीईआरटीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. यावरून नव्या वादाला तोंड फुटले, पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या नावाखाली मनुस्मृति अभ्यासक्रमात आणत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपावरून वादळ उठल्यानंतर आता मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृती तील श्लोकाचा समावेश करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आता यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन रामदास आठवले यांना दिले आहेत . त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति चे श्लोक येण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे. आठवले म्हणाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे. जातीभेद ,विषमता आणि माणुसकीला काडीमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी मनुस्मृतीमध्ये असल्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी विषमता आणि जातिभेदांच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध संघर म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक क्रांती केली. त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाडलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याने रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दूरध्वनी द्वारे सांगितले . त्यावर दीपक केसरकर यांनी मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांना दिले.