सोहम अकॅडमीत, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ साजरा–_———-
प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर

रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सोहम अकॅडमीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रशांतजी ठाकरे साहेब (नामांकित वकील, नाशिक) तसेच श्री शशिकांतजी गीते (सरपंच, आंबेगाव) श्री प्रमोदजी पवार (सामाजिक कार्यकर्ते, कोटमगाव) श्री हरिभाऊ आव्हाड (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी सोहम अकॅडमी चे संचालक श्री जयवंत भालेराव सर श्री एजाज शेख सर, श्री भूषण सावंत सर, श्री सागर कदम सर, श्री सोनुभाऊ खांगळ यांनी विशेष विशेष आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी चे विद्यार्थी चि. प्रथमेश महेश शेलार, चि. सिद्धेश थोरात यांनी केले, विद्यार्थी चि. प्रणव संतोष गोरडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ११वीच्या चि. ओमकार विजय राजोळे, चि. विकास बर्डे, कु. साक्षी गांगुर्डे, कु.सबा शेख, कु.अरेबिया तांबोळी, कु.मोनिका कुरहे व ९वी चे चि. ऋषिकेश नितीन गांगुर्डे, चि.ईश्वर फापाळे चि.ओम पोटे चि.शुभम फापाळे, चि. गौरव सरोदे यांनी विशेष मेहनत घेतली.
अकॅडमी चे संचालक यांनी यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी विषयाच्या सुट्टीतील मार्गदर्शन वर्गासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर लाभ घेण्याची आव्हान केले व पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर ९८२२४९५१८४, ९५४५१४२४८८, ९८९०१३९५६० संपर्क साधण्यास सांगितले.