गंगापूर रोडवर उड्डाणपूलासाठी नाशिक मनपाच्या अंदाजपत्रकात तरतूद करा… मा. नगरसेविका प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांची मागणी

नाशिक महानगरपालिकेतील सध्या अत्यंत वर्दळीचा असलेल्या गंगापूर रोडवर जेहाँन सर्कल व सप्तरंग हॉटेल चौकात उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे.. त्यासाठी नाशिक मनपाच्या 2023 -2024 च्या अंदाजपत्रक तरतूद करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक महानगरच्या उपाध्यक्ष मा. नगरसेविका प्रा.डॉ.वर्षा अनिल भालेराव यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
जेहान सर्कल येथे सध्या सिग्नल असून या सिग्नल वर संध्याकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी असते अशोक स्तंभाच्या साईडला शहीद सर्कल पर्यंत तर आनंदवली गंगापूरच्या साईडला सावरकर नगरच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या गेट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सप्तरंग हॉटेल चौकातही अशीच परिस्थिती असते 15 ते 20 मिनिटे चारही बाजूने वाहतूक खोळंबा होतो व त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो..
सावरकर नगर – अयोध्या कॉलोनी जवळ गोदावरी नदीवर नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे..हा उड्डाणपूल तयार झाल्यावर पेठ रोड, दिंडोरी रोड, मखमलाबाद, चांदशी, गिरणारे, या भागातून येणारी सर्व वाहतूक या उड्डाण पुलावरून जेहान सर्कल, लोकमत सर्कल, एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल सर्कल वरून मुंबई-आग्रा हायवे किंवा त्या पलीकडच्या उपनगरामध्ये व त्याच्याही पुढे नगर पुणे हायवे कडे जाईल त्यामुळे या भागात प्रचंड वाहनांची वर्दळ होईल..
आपण अंदाजपत्रकात तरतूद केल्या नंतरही हे पूल होण्यास दीड दोन वर्षांचा कालावधी लागेल तेंव्हा तर गंगापूर रोड वरील वाहतुकीची समस्या अत्यंत जटिल झालेली असेल..
या सर्व गोष्टींचा विचार करून या उड्डाण पुलांसाठी मनपाच्या 2023 -24 च्या अंदाज पत्रकात निश्चित तरतुद करावी असेहि
प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांनी आपल्या निवेदनात विषद केले आहे