ताज्या घडामोडी

मांजरगाव येथे असणारे गतिरोधक आणि त्यावरती सफेद पट्टे व फलक नाही त्यामुळे अपघात वाढले

संपादक सोमनाथ मानकर

राज्यमहामार्ग २७ वर मांजरगाव येथे असणारे गतिरोधक आणि त्यावर असणारे सफेद पट्टे सुचना फलक नाही त्यामुळे अपघात मोठया प्रमाणावर वाढले आहे
सिन्नरहून निफाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील वर्षी पूर्ण झाले. दिवसेंदिवस या मार्गाने वाहतूक वाढत आहे. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी म्हाळसाकोरे व माजरगाव विद्यालयाजवळ बसवण्यात आलेले उच्च गतिरोधकच अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे या ठिकाणी गतिरोधक टाकले असले तरी अतिउची, दिशादर्शक फलक व सफेद पट्टे न मारल्याने मीटर अंतरावर दोन घरासमोर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कमी अंतरात वेगावर नियंत्रण आणावे लागते. परिणामी, दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होतात. सदर गतिरोधक बांधकाम विभागाने तत्काळ काढावे, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. या ठिकाणी गतिरोधक टाकले असले तरी अतिउंची, दिशादर्शक फलक व सफेद पट्टे न मारल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत. म्हाळसाकोरे येथील मांजरगाव फाट्यावर जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांचे महाविद्यालय व हायस्कूल आहे. साहजिकच वर्दळ असते. सायखेडा व निफाडकडे दोन मार्ग जातात. हा मार्ग महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा असून या रस्त्यावरून सिन्नर, घोटी, संगमनेर, पुणे, निफाड, पिंपळगाव, वणी, वधई, लासलगाव, येवला, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, मनमाडकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक असल्यामुळे येथे गतिरोधक टाकले आहेत. परंतु वाहनचालकांना समजेल असे दिशादर्शक फलक न लावल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ उडून अपघात होत आहेत. मागील महिन्यात धारणगाव (रुई) येथील महिला दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाली होती. याठिकाणी राज्यमहामार्ग २७ वर मांजरगाव ते खानगाव थडी जे गतिरोधक टाकण्यात आलेले असून त्याची चौकशी करून जे गतिरोधक अनधिकृत असेल ते गतिरोधक लवकरात लवकर काढण्यात यावे अन्यथा प्रहार स्टाईलने आदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपअभियंता अधिकारी बांधकाम विभाग निफाड यांना देण्यात आले यावेळेस प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे युवा नेते दिपक जगताप तालुकाध्यक्ष अमोल ब्राम्हणे उपजिल्हाप्रमुख किशोर शिंदे रामेश्वर जगताप बबलू वैद्य गणेश आव्हाड मयुर वैद्य आदी उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.