प्रणित कलेक्शनचा लेक वाचवा अभियान कौतुकास्पद…..आ.छगन भुजबळ
कपडेच्या पिशवीवर छापलि लेक वाचवा कवीता.....

निफाड येथील उगांव रोङला असलेले प्रणित कलेक्शन दालनाचे संचालक सागर निकाळे हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवतात एक जानेवारीला नविन वर्षात जन्मलेल्या मुलींना मोफत कपडे वाटप करुन मुलीच्या आईची ओटी भरुन साङी चोळी देऊन सन्मान करतात स्ञी भृण हत्या थांबावी यासाठी ते विविध प्रकारे जनजागृती करत असतात नुकतेच त्यांनी आपल्या प्रणित कलेक्शन च्या कागदी पिशवीवर
का ग आई …
मी ही मुलगी
तु ही मुलगी
बळी मिच का जाते
असुन बाई
का ग आई
प्राण असा तु घेते…
उदरी तुझीया माझे येणे
किमया सारी न्यारी
ठेव एक तु ध्यानी आई
तुही जन्माने नारी
विचारुन बघ जगास
सऱ्या तुझे नी माझे नाते…
आई म्हणजे असे सावली
जगी सार हा आहे
सांग तुझ्या या लेकीचा तुला का भार आहे
वंशाची वेल ही वाढते
मीच पुढे ती नेते
माय जिजाऊ- सावीञी
अहिल्या – रमाईमाता
मदर तेरेसा-लतादीदी
जन्मेल कशि ती आता
मी ही उद्याची होईल झाशी
वचन तुला मी देते
अशा आशयाची लेक वाचवा ही कवीता प्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी यांनी लिहिलेली कवीता छापली असुन त्या पिशवीचे लोकार्पण मा.जी.उपमुख्यमंञी छगन भूजबळ यांच्या हस्ते .म.वि.प्र.सरचिटणीस नितीन ठाकरे.सभापती बाळासाहेब क्षिरसागर.जेष्ठ नेते शिवाजीदादा ढेपले.भाऊसाहेब बोचरे. विनोद जोशी.दत्ताञय ङुकरे.महेंद्र देशपांडे. विनोद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या पिशवीचे वाटप करुन प्रचार माध्यमातून समाजातील स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रबोधन होईल व अनेक लेकींचा जीव वाचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करण्यात आला असुन स्ञी भृण हत्येचे प्रमाण वाढत असुन स्ञी भृण हत्या थांबली पाहीजे आणी मुलींना देखिल हे सुंदर जग बघता आले पाहीजे खर तर प्रणित कलेक्शनच्या माध्यमातून ही जनजागृती होत आहे ही विशेष कौतुकास्पद बाब असल्याचे मत आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले व संचालक सागर निकाळे यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या तसेच लेख वाचवण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे त्याबद्दल पंचक्रोशी मध्ये सुद्धा कौतुकाचे थाप सागर निकाळे यांच्यावरती पडत आहे