
भ. प तात्याबा महाराज भोये कोपूर्ली बु .ता .पेठ .जिल्हा नाशिक तसेच कुंभीपाडा गावकर यांच्या सहकार्याने कुंभीपाडा मारुती मंदिरात मेळावा संपन्न झाला ज्या प्रकारे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटले जाते त्याचप्रमाणे कलावंतांची व कलाकारांची भूमी म्हणणे योग्य राहील कारण माणसाच्या धावपळीच्या जीवनात मनावरील ताण तणाव कमी होऊन मन प्रसन्न होण्यासाठी कलांचा उपयोग मनुष्याला होत आहे कलाकारांची कला बघून मनुष्य जीवनातील सर्व दुःख विसरून माणूस प्रसन्न होतो त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना दाद मिळावी असे मेळाव्यात सांगण्यात आले या मेळाव्यात डोक्यावर फिरणारे झुंबर ,रंगीत गोंड्यांनी धरलेलला मनोहरी फेर, तरपा नृत्य ,मदोल नृत्य, तुर नृत्य ,याबरोबरच ढाका वाद्याची नृत्य ,सादर करण्यात आले लोकनाट्य तमाशा ,बतावणी लावणी ,वासुदेव भोपी ,पारंपारिक जागरण गोंधळ ,वाघ्या मुरळी, लोकगीते अशा अनेक प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या याप्रसंगी महाराष्ट्र मराठा शाहीर व मराठा लोक कलावंत परिषदेतर्फे झालेल्या पाहुचारी बारी येथे लोकालावंत मेळाव्याचे लोककला मेळाव्यास पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा ,भागाचे आदिवासी कलावंत, महाराष्ट्र मराठी शायरी मराठी कलावंत परिषद ,अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्ष ,श्री विश्वास कांबळे यांना अध्यक्ष स्थान भुसविण्यात आले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर, शाहीर श्री बाळासाहेब भवर, माजी जिल्हा परिषद सदस्य छबीबाई गवळी ,पोलीस पाटील अशोक मोरे ,ज्येष्ठ नेते रामदास वाघेरे ,भारतीय आदिवासी विकास परिषद युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी ,ज्ञानेश्वर वाघमारे उपसरपंच नामदेव पाडवी सदस्य मीनानाथ चौरे राहुल धूम लक्ष्मीबाई चौरे योगिता गवळी वनिता मोरे कांताबाई गवळी पांडुरंग मोहरे तसेच परिसरातील आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील तरुण मित्र मंडळ उपस्थित होते कलाकारांनी मेळाव्यात विविध मागण्यांची प्रस्ताव मांडले त्यामध्ये नाशिक मध्ये लोक कला विद्यापीठ स्थापन करण्यात यावी लोक कलावंतांचे मासिक मानधन 5000 पर्यंत करावे शासकीय कोट्यातून घरे मिळावी लोककलावंतांसाठी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलिसी मिळावीत लोक कलावंतांच्या मुलांसाठी प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत द्यावे लोककलावंतांना सांस्कृतिक मंत्रालयाकडून कलावंत म्हणून ओळखपत्र मिळावे प्रवास भारत सवलत मिळावी साहित्य खरेदीसाठी दहा लाखापर्यंत शासनाकडून अनुदान देण्यात यावे असे प्रश्न मानण्यात आले त्यामध्ये शाहीर बाळासाहेब भवर यांनी आपल्या कलेचे लावणी सादरीकरण केले