कोटमगाव येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर.

कोटमगाव सविस्तर वृत्त असे की, कोटमगाव येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री. जयदत्त होळकर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी अध्यक्षस्थान भूषविले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती मा .श्री. शिवा आप्पा सुरासे सामाजिक कार्यकर्ते टाकळी ग्रामपंचायत सदस्य श्री.केशवराव जाधव श्री. हरिश गवळी कोटमगावचे सरपंच सौ. आरतीताई कडाळे उपसरपंच श्री. योगेश पवार कोटमगावचे पोलीस पाटील श्री. सचिन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री सचिन पवार यांनी केली या कार्यक्रमास माननीय श्री जयदत्त होळकर व श्री. शिवा आप्पा सुराशे यांनी आदिवासी समाज विकसित होण्यासाठी सर्व समाज एकत्रित येऊन सहकार्य करावे येणारा काळात कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आम्ही मदतीस सक्षम राहू अशी ग्वाही दिली. अतिशय चांगल्या पद्धतीने कोटमगाव येथील आदिवासी मित्र मंडळाने व ग्रामस्थ ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती यांनी जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन केले . या कार्यक्रमास आदिवासी महिला, आदिवासी समाज बहुसंख्येने उपस्थित होता अशाच पद्धतीने एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आनंदाने करावे असे सांगण्यात आले