ताज्या घडामोडी

येवला तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर सायकल यात्राअनोखी सामाजिक संदेश देणारी

मुख्य संपादक राहुल वैराळ

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तसेच तालुका विधी सेवा समिती अक्कलकोट, संयुक्त विद्यमानाने सतराव्या वर्षी विधी साक्षरता जनजागृती करणारी सायकल यात्रा काढली आहे.

मकरसंक्रांत व भारतीय सेना दिनाचे औचित्य साधत यात्रा रवाना झाली.

हि यात्रा पिंपळगाव जलाल येथून निघाली यंदा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेची माहिती जनसामान्यान पर्यंत यात्रेच्या माध्यमातून देण्यात येईल.

येवला , तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर असे एकूण ५२६ किलोमीटर सायकल यात्रेचे नियोजन दरवर्षी केले जाते.


या दरम्यान विविध सामाजिक संदेश समाजामध्ये देण्यात येतात, त्यात सायकल चालवा देश वाचवा,
पाणी आडवा पाणी जिरवा,
बेटी बचाव,
वन जीवन संरक्षण,
नैसर्गिक संवर्धन,
वाहतूक सुरक्षा,
लोकन्यायालय व मध्यस्थ केंद्र
यांचे महत्त्व
रक्तदान
अवयवदान
यासारख्या अनेक विषयांवर जनजागृती मोहीम राबवली जाते.

त्याचाच एक भाग म्हणून सौ. सुरेखा कल्यानशेट्टी विद्यालय अक्कलकोट येथे न्यायाधीश बाळासाहेब गायकवाड, न्यायाधीश आर. एम. शेख, न्यायाधीश पाटील, न्यायाधीश बाळासाहेब पवार, तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सर्व सायकल स्वार, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच अक्कलकोट पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संस्थेचे पदाधिकारी डॉ. आव्हाड यांनी संस्थेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

या यात्रेत डॉ. विक्रम आव्हाड नवनाथ भोरकडे, बाळासाहेब पवार, विजय भोरकडे, पत्रकार अभय पाटील, गणेश भोरकडे, विशाल खोकले नवनाथ भोरकडे, अर्जुन देवरे नितीन कोकाटे, गोरख घोटेकर प्रदीप पांढरे ,साईनाथ गायकवाड, पवन हिरे, राजेंद्र मोरे, युवराज गंगावणे,अजित चौधरी, सोनवणे, शांताराम भोरकडे, प्रभाकर डुंबरे, सागर झावरे, श्रीकांत खंदारे, रुपेश आहेर, बाळासाहेब बनकर, आदींनी सहभाग नोंदविला.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.