
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत नायगाव येथील अॅड. कीर्ती शिवाजीराव कातकाडे.
यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी राज्यात 35 वा रँक मिळवला. या यशाने नायगाव खोऱ्यासह सिन्नरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला गेला आहे.
अॅड. कीर्ती कातकाडे यांनी 2008 मध्ये बी. फार्मसी, 2011 मध्ये एम.बी.ए., 2014 मध्ये एल.एल.बी., तर 2022 मध्ये एल.एल.एम.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत यश मिळविले आहे. या पदाच्या एकूण 63 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात कीर्ती यांनी 35 वा रँक मिळविला.
कीर्ती ह्या नायगाव येथील एसएसके धनलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संस्थापक स्व. शिवाजीराव कातकाडे यांच्या कन्या तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन संग्राम कातकाडे यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या यशाबद्दल सिन्नर तालु्कासह नाशिक जिल्ह्यातून कौतूक होत आहे.
चौखट
स्पर्धा परीक्षेसाठी आई-वडील व कुटूंबाकडून प्रेरणा मिळाली. प्रामाणिक प्रयत्न व अभ्यासात सातत्य असल्यास यश नक्कीच मिळते. वडील स्व. शिवाजीराव कातकाडे यांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी खऱ्या अर्थाने या यशाचे गमक आहे. दीड वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. मुलगी म्हणून मी स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे ही त्यांची इच्छा होती. हे यश बघायला स्व. दादा आमच्यात असते तर आनंद द्विगणित झाला असता.
– अॅड. कीर्ती शिवाजीराव कातकाडे