शहादा -मुंबई बस नाशिककडे जात असताना चांदवड घाटात बसने अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली.
मुख्य संपादक राहुल वैराळ

नाशिक जिल्ह्यातील चांदवड राहुडबारी घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चालकाने वेळी प्रसंगावधन राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि मोठा अनर्थ टळला. गेल्या काही महिन्यांपासून खाजगी वाहनांना आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बसने अचानक पेट घेतला. चालकाला बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. बस एका बाजूला घेतल्यावर काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली.
बसने पेट घेताच चालक आणि कंडक्टरने सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर मंगरुळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.