चाळीसगावतील तरुणाची हत्या प्रकरणी; पाच आरोपींना अटक

चाळीसगाव: शहरातील दिनेश उर्फ (भावडु) वाल्मीक जाधव (वय-२८) रा. पवारवाडी चाळीसगाव, या तरुणाच्या खून प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात कोणाच्या गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी पोलीस बंदोबस्तात मृत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील पोदार शाळेजवळ रविवारी १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६:४० वाजेच्या सुमारास दिनेश उर्फ (भावडु) हा त्याच्या मित्र निखिल राजपूत सोबत गप्पा मारत असतांना संशयित अंकित महेंद्र मोरे, संकेत महेंद्र मोरे, अनिकेत महेंद्र मोरे, मुकेश उर्फ भुऱ्या मोरे, सर्व (रा. हनुमानवाडी चाळीसगाव) रोहित उर्फ पावट्या, अशोक गवळी ( शिवाजी चौक ), हर्षल दीपक राठोड, (रा. जुना मालेगाव रोड), श्याम उर्फ भोला, इतर पाच अनोळखी दुचाकीसह बुलेटवर येऊन बुलेट व मोटरसायकलवर दिनेश जास्त मातला असून याच्या काटा काढावा लागेल असे म्हणत शिवीगाळ केली तसेच दोघा-तिघांनी त्यांच्या हातातील चाकू दिनेशच्या गळ्याच्या खाली छातीवर व पोटावर वार केले तर अन्य आरोपींनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने जागीर दिनाच्या मृत्यू ओढवला होता.
याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात वरील आरोपींना विरोधात मयताचे वडील वाल्मिक रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला. या कोणाला दोन गटातील पूर्ववैमनस्यी येणार असल्याचे बोलले जात आहे.
तपास निरीक्षक के.के. पाटील यांचे मार्गदर्शनखाली सहा. निरिक्षक सागर ढिकले करीत आहे.