येवला पाटोदा येथील कृष्णाभाऊ शेटे यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार प्रदान.
मुख्य संपादक राहुल वैराळ

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन
पाटोदा येथील कृष्णाभाऊ शेटे गेले अनेक वर्षे सत्संगातुन भाविकांना बाबाजींनी सुरू केलेल्या धार्मिक कार्याची महती व लहान मुलांवर बालवयातच चांगले संस्कार होण्यासाठी,भारतीय संस्कृतीचे विचार त्यांच्या बालमनावर रुजवन्या साठी नामजप हे सर्वश्रेष्ठ साधन असून नामजप हाच आधार असल्याने,बाबाजींनी जपानुष्ठानासारख्या परंपरेतून एक चांगल्या व्यक्तिमत्वाची केलेली निर्मिती व अनेकांना दिला गेलेला व्यसनमुक्तीचा संदेश,अश्या या बाबाजींच्या महान कार्याचे सतसंगातून पाटोदा येथील बाबाजींचे लाडके,कथा प्रवक्ते कृष्णा भाऊ शेटे यांना त्यांच्या धार्मिक कामाबद्दल अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन समिती येवला,एवम ब्रिक्स ह्यूमन राईट्स मिशन येवला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या वेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे,सुरेश बढे,गोरख अहिर,कहैय्यालाल कानडे,पप्पु शेटे,गोरख बोऱ्हाडे,निवृत्ती बोऱ्हाडे निर्मला बुल्हे,सूनन्दा आव्हाड,सुरेश जऱ्हाड,जालींदर कदम,नवनाथ जाधव,तसेच जय बाबाजी भक्त परिवारासह पाटोदा पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.