
लासलगाव :- येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, प्रा किशोर गोसावी प्रा. सुभाष रोटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. देवेंद्र भांडे, आणि प्रा. सुनील गायकर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. विद्यार्थी किरण अंकुळनेकर, ऋतुजा कांदळकर व नम्रता राजोळे यांची महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली. यावेळी पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार आणि प्रा. किशोर गोसावी यांनी देखील विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रमाधिकारी देवेंद्र भांडे यांनी कले. सूत्रसंचालन प्रा. सुनील गायकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा. सुनिल गायकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक यांनी प्रयत्न केले.