पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या बैलगाडीला…….
नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव
पोटाची खळगी भरण्यासाठी
ऊस तोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या बैलगाडीला महामंडळाच्या भर वेग बसची धडक बसल्याने नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील माय लेकाचा जागीच मृत्यू झाला यात एक बैलाचा ही मृत्यू झाला आहे. हा अपघात औरंगाबाद पुणे महामार्गावरील हेसरवाडी फाटा जवळ मंगळवारी झाला
अधिक माहिती ऊसतोड कामगार हा नांदगाव तालुक्यातील माणिक पुंज येथील
गोविंद विठ्ठल गिरे 45
बाळू गोविंद गिरे 15
कलाबाई गोविंद गिरे 40
अर्जुन गोविंद गिरे 10
अशा एकाच कुटुंबातील
चार जण बैलगाडीतून औरंगाबाद पुणे महामार्गाने जात असताना बैलगाडी इसरवाडी फाट्या जवळ महामार्ग ओलांडत असताना नाशिकहून औरंगाबाद कडे जणाऱ्या एसटी बसची बैलगाडीला पाठीमागून धडक बसली या अपघातात बैलगाडीतील कळाबाई व अर्जुन
या मायलेखाचा जागेत मृत्यू झाला तर पती गोविंद व मुलगा बाळू हे गंभीर जखमी झाले तर यामध्ये एकाचे प्रकृती गंभीर चिंताजनक आहे.
अपघात इतका भयानक होता की यात बैलगाडीचा एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे
दरम्यान या अपघाताची माहिती मिळतात वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सय्यद हनीफ अंमलदार विक्रम माडवी जयेश जाधव यांनी घटना स्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.