ताज्या घडामोडी

अध्यापक विद्यालय रुकडीत जागतिक महिला दिन साजरा किशोरवयीन मुलां -मुलींचे आरोग्य विषयावर राजश्री साकळे यांचे व्याख्यान

रुकडी / प्रतिनिधी

 

बदलती जीवनशैली , समाज माध्यमांचा प्रभाव व वाढते ताणतणाव या मुळे आजच्या किशोरवयीन मुलां-मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे समाजातील सर्व घटकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत समुपदेशक व ‘शारीरबोध’ संस्था कोल्हापूर च्या संस्थापिका राजश्री साकळे मॅडम यांनी व्यक्त केले. त्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छ. शाहू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी येथे जागतिक महिला दिना निमित्त ‘ किशोरवयीन मुलां -मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य ‘ या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. विलास पाटील सर होते. प्रा.कांचन खराटे ,प्रा. मिनल पाटील तसेच प्रथम व व्दितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

प्रा .डॉ. राम चट्टे यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केले तर प्रशिक्षणार्थी स्वाती लाटे यांनी आभार मानले .

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.