एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावरती सप्तशृंगी गडावरती बस ने अचानक घेतला पेट
संपादक सोमनाथ मानकर

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त लाखो भावीक गडावरती येत आहेत याच अनुषंगाने आज पिंपळगाव डेपोची बस क्रमांक MH.14.BT.3752 बस ही सप्तशृंगी गड या ठिकाणी येत असताना सप्तशृंगी गडाच्या दीड किलोमीटर पाठीमागे बस ने अचानक वायरिंग शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला परंतु ड्रायव्हरच्या सावधानतेने साईटला गाडी उभी करून भाविकांनी गाडीच्या मिळेल त्या भागातुन उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही बसमध्ये साधारणतः 40 ते 50 प्रवासी होते कुठेही नुकसान झालेले नाही ही आग विझवण्यासाठी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी नासिक जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी रोपे वे ट्रॉलीचे कर्मचारी कळवन पोलीस प्रशासन सर्वांनी तातडीने एकत्र येत आग विझवली..
नासिक नांदूर नाका या ठिकाणी सकाळी बसला आग लागून 12 प्रवासी यांचा मृत्यू झाला असून याच अनुषंगाने अजून सुद्धा श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती लाखोच्या संख्येने भाविक हे कोजागिरी निमित्त गडावर येणार असून सुद्धा एसटी महामंडळाने खबरदारी घेतली नाही असा प्रकार या ठिकाणी दिसून आला आहे कारण सप्तशृंगी गड या ठिकाणी सातव्या माळेला सुद्धा अशाच प्रकारे गर्दीमध्ये एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला होता त्यानंतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये अनेक चॅनेलंना बातमी प्रसारित झाल्यानंतर असे वाटले होते की आता तरी एस टी महामंडळाला जाग येईल परंतु महामंडळ याकडे कुठले ही लक्ष देत नसल्यामुळे भाविकांना परत एकदा मनस्ताप सहन करावा लागला. कारण सातव्या माळेला बसमुळे लाखो भाविकांना दहा किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला त्याची पण पुनरावृत्ती परत होऊ नये या करता सप्तशृंगी निवासन देवीच्या कार्यालयामध्ये मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंगमध्ये काय झाले हे फक्त त्या ठिकाणी असलेल्या प्रशासनाला माहिती झाले कारण कुठल्या ही पत्रकारांना या ठिकाणी बोलावण्यात आले नसल्यामुळे या ठिकाणी प्रकारची कुठली बातमी झाली नाही की प्रशासन कुठल्या प्रकारे काम करणार आहे आणि आज परत बस एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला
एसटी महामंडळाची बस गडावर जाताना अचानक पेट घेतला असे अनेक चॅनेलंना बातमी प्रसारित होताच भाविकांनी वनी या ठिकाणी पाणी देऊन परत जाणे पसंत केले. अनेक भाविकांचे असे म्हणणे आहे की सप्तशृंगी गडावर ती सातव्या माळेला भाविकांचे हाल झाले त्यानंतर आज परत अचानक बसणे पेट घेतल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे भाविक अर्ध्या रस्त्यात न वणी या ठिकाणी देवीला पाणी देऊन परत जाणे पसंत करत आहे
चौकट .गडावरील दुकानदार व्यवसायिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये अतिशय नाराजी निर्माण झालेले आहे कारण लाखो रुपयाचा माल दुकानांमध्ये भरलेला असताना व्यापाऱ्यांना पैसे परत करायचे कसे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण नवरात्र मध्ये सुद्धा संतदार पाऊस सुरुवात होता त्यानंतर दुकानदाराला अशा होती की कोजागिरी पौर्णिमा होईल परंतु त्या दोन दिवसासाठी सुद्धा पाऊस सुरू आहे त्यात बसेसचे असे प्रकार होत असल्यामुळे भावीक गडावर येण्यासाठी घाबरत आहे त्यामुळे आमचा लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांना पैसे परत कसे करायचे हा मोठा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे.रामप्रसाद बत्तासे व्यवसायिक स गड
चौकट. श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी शंभर टक्के रूम येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध असतात परंतु या ठिकाणी यात्रा कालावधीमध्ये जे पोलीस प्रशासनाचे पदाधिकारी किंवा कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी गडावर येत असतात त्यांना आम्हाला 50 टक्के रुम उपलब्ध करून द्यावा लागतात त्यामुळे येणाऱ्या भाविकांना रूम उपलब्ध होत नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत प्रकाश जोशी देवस्थान पदाधिकारी
चौकट.आई भगवतीचे कावडधारकांनी आणलेले पाणी आम्ही रविवारी दुपारी बारा वाजता घेणार होतो परंतु या ठिकाणी पाऊस व धुके असल्यामुळे भाविकांना आमच्याकडून रुम उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही भाविकांची माफी मागून आज शनिवारीच पाणी घेण्यास सुरुवात करत आहोत व त्याप्रमाणे आम्ही माईक व दूरध्वनी शेपनद्वारे सर्वांना माहिती दिली आहे की ज्यांना आता आणलेले कावडीचे पाणी हे द्यायचे असेल त्यांनी मंदिरामध्ये जमा करावे जेणेकरून त्यांना उद्या ते पाणी आई भगवतीच्या अंघोळीसाठी वापरले जातील
विशेष कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर देवस्थान
श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून लाखो भाविक कावड घेऊन गडावर येत असतात यामध्ये असलोत औरंगाबाद चाळीसगाव धुळा भुसावळ नाशिक शिर्डी त्र्यंबकेश्वर कोपरगाव कन्नड सिन्नर अशा अनेक भागातून श्रीक्षेत्र सत्संग गडावरती कावड धारक भाविक येत असतात परंतु गेल्या दहा ते पंधरा दहा दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे सर्वत्र गडावरती ओलसर असल्यामुळे व ठिकाणी रूम सुद्धा उपलब्ध होत नाहीये किंवा इतरही सुविधा उपलब्ध नाही आहे याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गाण्याचे सुविधा नसल्यामुळे आम्ही आई भगवतीला पाणी देऊन लगेच परत जात आहोत
भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, नांदुरी ते सप्तशृंगी गड या यात्रा उत्सव दरम्यान अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती संदर्भीय आपत्ती व्यवस्थापन प्रक्रिया, शोध व मदतकार्य प्रक्रियेसाठी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही नम्र विनंती
1800 2334 067 / 02592 253350
स नि देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे