
आठवड्याभरा पूर्वीच ३० सप्टेंबर ला मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या १०० कोटींची वंदे भारत एक्सप्रेस हायटेक रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला होता.
मात्र तीन दिवसांपूर्वी अहमदाबाद पासून काही अंतरावर म्हशींच्या कळपाला धडक देत या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चा अपद्यात झाला, सुदैवाने यात जीवित हनी झाली नसली तरी या एक्सप्रेस रेल्वेच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले होते, यांनतर सलग तीन दिवसांच्या दुरुस्ती नंतर आज वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा रुळावरून धावेल. वन्दे भारत एक्सप्रेस ही सेमी हाई स्पीड ट्रेन आसल्यानी तिला सेमी बुलेट ट्रेन म्हंटले जाते वंदे भारत एक्सप्रेस ची स्पीड १८०km/h आहे. परंतु सध्या स्थिती बघता ही एक्सप्रेस केवळ १२०km/h ने चालवली जाणार आहे.