सामाजिक कार्यकर्ते व लासलगाव मर्चन्ट बॅंकचे संचालक प्रवीणभाऊ कदम यांचे तर्फे रेल्वे स्टेशनं रस्त्याची डागडुजी
मुख्य संपादक राहुल वैराळ

गेल्या अनेक दिवसापासून लासलगाव रेल्वे स्टेशनं ला जाणाऱ्या रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पसरले होते वाहनाना ये-जा करण्यासाठी मोठया प्रमाणावर कसरत करावी लागत होती सदर अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ कदम यांचे तर्फे सदर रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात आली त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी ,रिक्षा चालक-मालक संघटना तसेच ट्रक चालक-मालक संघटना पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित सुभाष आप्पा बोराडे,प्रकाश नाना पाटील, बाळासाहेब (छत्र ) होळकर,भैय्या नाईक, ग्रामपंचायत सदस्य राम बोराडे, केशवराव जाधव, ललुशेठ ब्राम्हेचा, अनिल निकम, विजय शिंदे, रफिक सय्यद व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते…… स्थानिक नागरिक व प्रवाशांनी सदर रस्त्याचे लोकप्रतिनिधी कडून कायमस्वरूपी काम व्हावे अशी इच्छा व्यक्त केली