
प्रतिबंधात्मक कारवाई करू नये यासाठी तक्रार कडून दीड लाख रुपये लाच घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दत्तात्रय सखाराम शिंदे (रा. बीड) याला रंगेहात पकडले .त्यांच्याकडून सुमारे 50 लाख रुपये ,सोने चांदीचे दागिने ,सव्वा लाखाची रोकड व एक कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्र आढळून आली या प्रकरणात अटक झालेल्या शिंदे सह इतर दोघांना न्यायालयाने दीड दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिंदे सह हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील दोघे( रा. देवपूर ,धुळे) अशी संशयित लासखोर पोलिसांची नावे असून तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू नये त्या मोबदल्यात शिंदे यांच्या सांगण्यावरून इतर दोघांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली असता तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती दिली असता लाचलुचपत विभागाने सापळा रचून संशयितांनी पंचासमोर तळजोड करीत दीड लाख रुपयाची लाच स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले. तिघा विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान विभागाने संशयीताच्या घराची झडती घेतली असता, 59 लाख रुपयाचे 900 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दहा लाख रुपयाचे चांदीचे दागिने एक लाख 26 हजार रुपयाची रोकड, स्वतः पत्नी व इतर नातलगाच्या नावे असलेली एक कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. शिंदे व इतर दोघे यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.