माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते निफाड येथे पत्रकारांचा गुणगौरव
देशाची मान ताठ ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची; पत्रकारांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये - छगन भुजबळ

नाशिक,निफाड,दि.५ फेब्रुवारी :-पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. सत्यघटना मांडण्याची जबाबदारी पत्रकारांवर असून देशाची मान ताठ ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता काम करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
माणुसकी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने निफाड येथे पत्रकार गुणगौरव सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित रुद्राय हॉटेल निफाङ येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, माजी येवला पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, राजाभाऊ शेलार, दत्तात्रय डुकरे, ॲड. प्रवीण ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार, महेंद्र देशपांडे, भाऊसाहेब बोचरे, सरपंच विनोद जोशी, प्रवीण मोगल, संस्थेचे अध्यक्ष सागर निकाळे, मधुकर शेलार. बापुसाहेब कुंदे .रामेश्वर माळी.दिपक माळी. सरपंच दिपक सोनवने .तालुकाध्यक्ष दिगंबर वडघुले, उपाध्यक्ष राहुल सोनवणे.नानाभाऊ सांगळे.अरुण थोरे.दिनेश काऊतकर .यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, स्व.इंदिरा गांधी यांनी देशात कायद्याचा आधार घेऊन आणीबाणी घोषित केली होती. काही काळानंतर ती उठविली आणि निवडणुकीला सामोऱ्या देखील गेल्या. मात्र सद्या देशात लिखाण करणाऱ्यांवर आणि बोलणाऱ्यांवर दबाव आणला जात असून अघोषित आणीबाणी सुरू आहे असा सुर साहित्य संमेलनात उमटत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. पत्रकारिता क्षेत्रावर देखील दबाव आणला जात आहे. त्यामुळे अनेक पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र आजही अनेक माध्यमे दबावाला बळी न पडता काम करत आहे. ते काम त्यांनी सुरूच ठेवावे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास लाभला आहे. अनेक नामवंत पत्रकारांची परंपरा राज्याला लाभलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील स्वातंत्र्योत्तर काळात वर्तमानपत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचं काम केलं असे सांगत पत्रकारांनी नकारात्मक बातम्यांवर अधिक लक्ष केंद्रित न करता सकारात्मक बातम्यांना अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. टीव्ही सोशल मीडिया याचा वापर अधिक वाढला असला तरीही आजही वर्तमान पत्रांनी आपली जागा टिकवून ठेवली असून ती अधिक विश्वासार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, पत्रकारांनी शोध पत्रकारिता करण्याची गरज असून शोध पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य समाजासमोर मांडण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकताच हिडन बर्ग संस्थेने अदानी समूहाचा संस्थोधनात्मक अभ्यास करून समूहाचा अहवाल समाजासमोर मांडला.त्यामुळे आदानी समूहाचा फुगा फुटला असून सत्यता सर्वांसमोर आली आहे. या समूहात देशाच्या महत्वपूर्ण संस्थांचा पैसा आहे. त्यामुळे अशा प्रकारची माहिती जनतेसमोर येऊन देशहितासाठी सत्यता बाहेर येण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मोदी सरकारने अदानी सह अनेक मोठे भांडवलदारांना कोटीने कर्ज माफ केली व सामान्य जनता पतसंस्थेतून पाच दहा हजार रुपये साठी त्यांच्या घराला कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे हे सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजे तसेच माणुसकी सोशल फांऊङेशनला शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला तसेच स्ञी भृण हत्या थांबवावी यासाठी फाऊंडेशन ज्याप्रमाणे जनजागृती करत आहे ती कौतुकास्पद असुन माणुसकी फांऊङेशनचे कार्याला शुभेच्छा दिल्या
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजीराव ढेपले, ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
फोटो- माणुसकी सोशल फांऊङेशनचे वतीने आयोजित पञकार गुणगौरव सोहळ्यानिमित्ताने पारीतोषीक वितरण करतांना आमदार छगन भुजबळ व फांऊङेशनचे संस्थापक सागर निकाळे