अखंड हिंदुस्तान चा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन, भाटगांव ग्रामपंचायत येथे
ज्ञानेश्वर पोटे

अखंड हिंदुस्तान चा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन, भाटगांव ग्रामपंचायत येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा… झंजावला भगव्याचा सन्मान तुम्ही
.., जागविले मर्द मावळे तुम्ही.., घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही.., ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत.., श्री राजा शिवछत्रपती तुम्ही….!!!!! 6 जून हा दिवस संपूर्ण राज्यभर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतात भाटगांव ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त,माननीय सरपंच सौ.हिराबाई यशवंत पगार आणि माननीय उपसरपंच श्री किरण भवर ग्रामपंचायत कर्मचारी श्री नवनाथ पवार सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव या शाळेचे कलाशिक्षक श्री देव हिरे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उत्तम फलक रेखाटन केले.