लासलगाव फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष पदी उमेश पारिक तर उपाध्यक्ष पदी राहुल वैराळ तर सचिव पदी आसिफ पठाण यांची नियुक्ती.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव :-
लासलगाव फोटोग्राफर असोसिएशन च्या
अध्यक्ष पदी उमेश पारिक, उपाध्यक्ष पदी राहुल वैराळ तर सचिव पदी आसिफ पठाण यांची एक मतांनी निवडी करण्यात आली
लासलगाव फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव पदाच्या निवड प्रसंगी लासलगाव व परिसरातील फोटोग्राफर उपस्थित होते .यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष पदी उमेश पारिक यांची तर सचिव पदी आसिफ पठाण व उपाध्यक्ष राहुल वैराळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
. दरेकर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश पारीक यांनी यावेळी सांगितले की फोटोग्राफर बंधूंच्या हिताची अनेक उपक्रम यात विविध यशस्वी राज्यस्तरीय फोटोग्राफर यांचे मार्गदर्शनपर शिबीर तसेच फोटोग्राफर बंधूंसाठी अपघाती विमा देखील संघटनेच्या माध्यमातून काढण्यात येणार असल्याचे सांगितले
नवनिर्वाचित सचिव आसिफ पठाण यांनी यावेळी येत्या काळात संघटना ही फोटोग्राफरच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असेल कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्यासाठी संघटनेचा फोटोग्राफर हा एकटा नसून त्याच्या कुटुंबासोबत लासलगाव फोटोग्राफर असोसिएशन ही संघटना उभी असेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
उपाध्यक्ष राहूल वेराळ यांनी सांगितले की लासलगाव फोटोग्राफर असोसिएशन ही
संघटना फोटोग्राफरांचे हिताचा विचार करून पुढील कार्य करेल
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कुईटे (R.K.) यांनी केले,व आभार यांनी मानले..
या प्रसंगी नवनाथ पवार, अशोक कदम, सुभाष कदम, कैलास जाधव, बबलू जाधव, शितल जागडा, अमर जाधव ,अक्षय जगताप, पप्पू गवळी, प्रमोद दरेकर, लखन शिंदे ,अजिज खान पठाण, वैभव जाधव ,सुदर्शन हिरे,
राजेंद्र कुईटे, रविराज पवार, निलेश पवार, लक्ष्मण शिंदे, राहुल खैरनार, महेद् गाडगे, विशाल गोडेस्वर, बाळासाहेब आहेर
आधी फोटोग्राफर उपस्थित होते.