छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएम चा पाठिंबा.कोल्हापुरात निवडणुकीचे गणित बदलणार
नाशिक प्रतिनिधी

कोल्हापुर- राज्यात सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वातावरण जोर धरत आहे. त्यातच प्रत्येक उमेदवार आपण विजयी होण्यासाठी आपल्या मतदारसंघात मीच विजय होणार असा दावा करत जोमाने प्रचाराला लागलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघात ताकद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांचा पाठिंबा मिळवा यासाठी प्रयत्नशील आहे.अशातच या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. त्याचे कारण असे की या जागेवर राज घराण्यातील छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शाहू महाराजांची चांगलीच ताकद वाढलेली दिसत आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ एमआयएम ने पाठिंबा दिल्यामुळे तेथील निवडणुकीचे गणित बदलणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.